नर्सरीची फी 4 लाख 30 हजार पालकाने शेअर केलेला फी चार्ट होतोय व्हायरल

शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून शाळांकडून टर्म फी आणि विविध ऑक्टिव्हिटीच्या नावाखाली पालकांची अक्षरशः लूट केली जाते. दिल्लीत चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या आकाश कुमार या पालकाने आपल्या नर्सरीत शिकणाऱया मुलीच्या शाळेतील फी चार्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांनी आपल्या मुलीच्या नर्सरी स्कूलची फी 4 लाख 30 हजार रुपये असल्याचे सांगितले आहे.

माझ्या संपूर्ण शिक्षणाला जेवढा खर्च झाला नाही, तेवढी माझ्या मुलीच्या शिक्षणाची एका वर्षाची फी आहे. मला आशा आहे की, मुलीला त्या ठिकाणी चांगले शिक्षण मिळेल असे आकाश कुमार यांनी म्हटलेय. या पोस्टला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक ह्यूज आणि हजारो कॉमेंट्स आल्या आहेत. तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांना फीची रक्कम ऐकूनच धक्का बसलाय. नर्सरीसाठी लाखो रुपयांचा खर्च येत असेल तर पुढच्या शिक्षणासाठी किती खर्च येईल? असा सवाल उपस्थित केला जातोय.