एकाच दिवशी तानसा, विहार ओव्हरफ्लो! मुंबईकरांसाठी मार्चपर्यंत पुरणारे पाणी जमा

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा आणि विहार तलाव आज एकाच दिवशी तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुंबईसाठी सातही तलावांत सध्या 852957 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता हे पाणी पुढील आठ महिन्यांना म्हणजेच मार्चपर्यंत पुरणारे आहे. सात तलावांतील एकूण जलसाठा 60 टक्के झाला आहे.

विहार तलाव आज मध्यरात्री 12 वाजून 48 मिनिटांनी; तर तानसा तलाव आज पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. गेल्याच आठवडय़ात 20 रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ तानसा व विहार हे दोन्ही तलावदेखील आज ओसंडून वाहू लागले आहेत. मध्यरात्री ओसंडून वाहू लागलेल्या विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता ही 2,769.8 कोटी लिटर (27,698 दशलक्ष लिटर ) एवढी आहे.