‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी आठ सदस्यीय समिती; अमित शहा, अधीर रंजन चौधरींच्या नावाचा समावेश

‘एक देश, एक निवडणूक’ (वन नेशन, वन इलेक्शन)साठी केंद्र सरकारने शनिवारी 8 सदस्यीय समिती गठीत केली आहे. समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेचे माजी खासदार गुलाम नबी आझाद, 15व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. के. सिंह, लोकसभेचे माजी महासचिव डॉ. सुभाष सी. कश्यप, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी यांच्या नावाचा समावेश आहे. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल हे विशेष निमंत्रित म्हणून या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सहभागी होतील.