राहुल गांधी अमेठीमधून लोकसभा निवडणूक लढवणार

लोकसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे देशभरात सर्व पक्ष या निवडणूकांच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसकडून अजय राय यांच्याकडे उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे पद स्वीकारताच अजय राय यांनी राहुल गांधी यांच्याबाबतीत मोठी घोषणा केली आहे.

अजय राय यांनी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी हे येत्या निवडणूकीत अमेठी मधून निवडणूक लढवतील असे सांगितले आहे. 2019 च्या निवडणूकीत राहुल गांधी हे अमेठी व वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढले होते. मात्र अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. मात्र राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातून विजयी झाले होते.

गेल्या निवडणूकीत राहुल गांधी यांना पराभव पत्करावा लागल्यामुळे ते यंदा अमेठीमधून निवडणूक लढतील की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. याबाबत पत्रकारांनी अजय़ राय यांना विचारताच त्यांनी ”राहुल गांधी हे नक्कीच अमेठी मधून निवडणूक लढवतील” असे सांगितले आहे.