रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्मा मतदान, 14 मतदार बजावणार आपला हक्क

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्या दि.7 मे रोजी सकाळी7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.मतदारसंघातील 1942 मतदान केंद्रावर 14 लाख 51 हजार 630 मतदार आपला हक्क बजावणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी एम.देवेंदर सिंह म्हणाले की, 19 एप्रिल पर्यंत मतदान नोंदणी करता येणार होती.याकाळात 13 हजार 159 मतदारांनी नोंद केली आहे.मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. 1942 मतदान केंद्रावर प्रत्येकी एक पीठासीन अधिकारी असणार आहे.त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी तीन अधिकारी असतील.एकूण 8 हजार 588 कर्मचारी मतदान केंद्रावर असतील. 120 पोलीस अधिकारी,2 हजार 780 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. निवडणूकीच्या काळात 14 लाख 49 हजार 735 रूपये जप्त करण्यात आले.2 कोटी 46 लाख 22 हजार 893 रूपये किमंतीची 90 हजार लीटर दारू जप्त करण्यात आली.

85 वयोगटावरील मतदारांपैकी 2 हजार 673 मतदारांनी मतदानाची सहमती दर्शवली होती.त्यापैकी 2 हजार 493 मतदारांनी आपला हक्क बजावून मतदान केले.दिव्यांग मतदारांपैकी 400 मतदारांनी सहमती दर्शवली होती.त्यापैकी 388 मतदारांनी मतदान केले.

लॉजिंग-बोर्डिंगची तपासणी

राजापूर तालुक्यात भाजप पैसे वाटत असल्याची तक्रार आमदार राजन साळवी यांनी केली होती.त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, मतदारसंघातील लॉजिंग-बोर्डिंगची तपासणी करण्यात येत आहे.चेक नाक्यावर गाड्या तपासल्या जात आहेत.बंदोबस्तासाठी मुंबई,ठाणे,पालघर आणि नवी मुंबईतून पोलीस बळ मागविण्यात आले आहे.