चेहऱ्यावरील सुरकुत्या हमखास होतील कमी, कच्च्या दुधाचा करा ‘हा’ घरगुती उपाय

चेहरा उजळ, मुलायम, तुकतुकीत दिसावा यासाठी अनेक महिला, मुली ब्लिच,फेशियल अशा वेगवेगळ्या पार्लर ट्रिटमेंट्स घेतात. यामुळे चेहऱ्यावर तात्पुरता परिणाम होतो, मात्र चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी घरगुती उपाय जास्त फायदेशीर ठरतात.या उपायामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि चेहरा तजेलदार दिसण्यासाठी घरच्या घरी कच्च्या दुधापासून तयार केलेलं स्किन ब्राईटनिंग जेल कसं तयार करायचं ते पाहूया.

घरगुती स्कीन ब्राईटनिंग जेल बनवण्यासाठी 2 मोठे चमचे कच्च दूध घ्या. त्यात 1 चमचा साखर, 1 चमचा कोरफडीचा गर घालून व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण एका छोट्याश्या बाऊलमध्ये मिक्स करून नंतर चेहऱ्याला लावा. 10 मिनिटांनी स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा. आठवड्यातून 3 वेळा हा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतील आणि त्वचा उजळ व्हायला मदत होऊ शकते. साखरेमुळे त्वचा एक्सफोलिएट होऊ लागते. या जेलमुळे त्वचा संसर्गाचा धोकाही टाळता येऊ शकतो.

कच्च्या दुधाचे सोपे उपाय

– टोमॅटोचा रस कच्च्या दूधात मिसळून चेहऱ्याला मसाज करा. 20 ते 30 मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवा.

– कच्च्या दूधात कापसाचा बोळा बुडवून तो चेहऱ्याला लावा. थोड्या वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा.यामुळे त्वचेतील धूळ, घाणं निघून जाईल आणि त्वचा मऊ होईल.

– कच्च्या दूधात हळद मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टने काही मिनिटे मसाज करा.त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा.या उपायामुळे स्किन क्लिझर आणि स्किन टोनरप्रमाणे चेहऱ्यावर परिणाम होऊ शकतो.

– तांदळाच्या पिठात कच्च दूध मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट मुरुम, एक्ने असलेल्या ठिकाणी लावा.रात्रभर चेहऱ्यावर तशीच ठेवा. सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

– कच्च दूध आणि मध एकत्र करून चेहऱ्याला लावा.काही मिनिटं हलकासा मसाज करा.सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा.