दिल्लीत उष्णतेची लाट, पारा 40 सेल्सियस पार

दिल्लीत उष्णतेची लाट आली असून उन्हाचा पारा 40 सेल्सियस पार गेला आहे. या उन्हाळय़ातील उन्हाचा पारा सर्वाधिक आहे. पुढील तीन दिवस तापमान 41 डिग्री सेल्सियसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे, असे आयएमडीकडून सांगण्यात आले.  6 मे सर्वात हॉट दिवस ठरला. या दिवशीचे तापमान 41.1 डिग्री सेल्सियस नोंदले गेले. याआधी 2023 मध्ये मेच्या दुसऱया आठवडय़ात दिल्लीत 42 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद झाली होती.