नेहरू सेंटरमध्ये ‘कॉस्मिक अर्बन कनेक्ट’ चित्र प्रदर्शन

कॉस्मिक अर्बन कनेक्ट- कॉसमॉस आणि अन्य गोष्टींची परिणामकारकता अमूर्त चित्रांद्वारे पॅनव्हासवर साकारणारे विख्यात चित्रकार जगन यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन नेहरू आर्ट सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. 13 मे पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

सुंदरसन जगन्निवासन हे चित्रकार जगन यांचे मूळ नाव. त्यांच्या या चित्र प्रदर्शनातील आर्ट सोलो शो हा पॅनव्हासवर तैलरंग, अॅव्रेलिकच्या उत्कृष्ट मिश्रणातून एक मंत्रमुग्ध करणारा दृश्य प्रवासच म्हणावा लागेल. जगन यांची चित्रे स्पष्टपणे विश्व आणि मानव यांच्यातील नातेसंबंधावर भाष्य करतात.  प्रत्येक चित्र हे अनंत विश्वाच्या प्रवेशद्वारासारखे आहे. अभिव्यक्ती म्हणजे कलाकाराची अमूर्त विचार प्रक्रिया एखाद्याला जाणवणाऱया जीवनाच्या ऊर्जेमध्ये कशी मिसळते. हे जगन यांच्या चित्रातून प्रत्ययाला येते.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला कलाकार किसलय व्होरा, शीना साहनी व्होरा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज  दारा पटेल, डॉ. आर.के. संघवी, आलोके सासमल आदींचा समावेश होता.