घरच्या घरी बनवा ‘हा’ जबरदस्त स्नॅक्स

>> शेफ वरुण इनामदार

नेहमी नेहमी तेच खाऊन बोअर झाला असाल तर शेफ वरुण इनामदार यांनी तुमच्यासाठी एक सोप्पा असा स्नॅक्सचा पदार्थ सादर केला आहे. तुम्ही हा पदार्थ अगदी घरातले साहित्य वापरून झट की पट बनवू शकता. हाऊस पार्टी, मुलांचा डब्बा, सकाळचा नाश्ता यासाठी तर हा परफेक्ट आहे.

बॅटरसाठी लागणारे साहित्य:
• 1 कप बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ) न भाजलेले
• अर्धा कप ज्वारीचे पीठ, न भाजलेले
• 2 चमचे (टेबल स्पून) तांदळाचे पीठ
• पाव चमचा हळद
• चवीनुसार मीठ
• एक कप पाणी
• ब्रेडचे 8 स्लाइस
• तळण्यासाठी गोदरेज सनफ्लॉवर तेल

सारणासाठी साहित्य:
• एक कप गोदरेज जर्सी पनीर, पनीर कुस्करून घ्यावे
• अर्धा चमचा लसणाची पेस्ट
• पाव चमचा हळद
• अर्धा चमचा लाल तिखट
• पाव चमचा गरम मसाला
• अर्धा चमचा चाट मसाला
• मीठ चवी नुसार
• 2 चमचे ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

1. वर सांगितलेले सर्व साहित्य एका पातेल्यात घ्या आणि तिखट मीठ योग्य प्रमाणात आहे का याची चव पहा
2. हे सारण काही वेळ बाजूला ठेवा
3. बॅटरसाठी सांगितलेले सर्व साहित्य एका पातेल्यात घेऊन नीट मिक्स करून घ्या
4. बॅटरमध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घेत नीट फेटून घ्या.
5. एक ब्रेड घ्या आणि त्यावर बनविलेले सारां एक चमचा नीट पसरवून लावा.
6. दूसरा ब्रेड घेऊन आधीच्या ब्रेड वर व्यवस्थित सँडविच प्रमाणे ठेवा.
7. या बनविलेल्या सँडविचचे त्रिकोणी किंवा चौकोनी आकारात चार भाग करा
8. सर्व ब्रेडचे असेच सँडविच बनवून त्यांचे लहान काप करून बाजूला ठेऊन द्या.
9. एका कढईमध्ये गोदरेज सनफ्लॉवर तेल घेऊन ते तापवायला ठेवा
10. तेल छान गरम झाल्यावर ब्रेडच्या एका एका तुकड्याला बेसनाच्या बनविलेल्या बॅटर मध्ये घोळवून हळूच गरम तेलात सोडा.
11. सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत आणि ब्रेड कुरकरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळा.
12. तुमच्या आवडत्या केचअप, सॉस किंवा चटणी आणि तळून मीठ लावलेल्या हिरव्या मिर्च्यांसोबत या चविष्ट पनीर पकोड्यांचा आनंद घ्या.