पुतिन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका, बेडरुमध्येच कोसळले

putin

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. पुतीन हे या झटक्यामुळे बेडरूममध्येच कोसळले. जमिनीवर पडलेल्या अवस्थेत त्यांना पाहिल्यानंतर प्रचंड धावपळ झाली. पुतिन यांच्या बेडरूमबाहेर तैनात सुरक्षारक्षकांना पडल्याचा आवाज आला होता. त्यांनी तत्काळ डॉक्टरांना बोलावले. पुतीन यांची प्रकृती सध्या कशी आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

गेल्या काही दिवसांत पुतीन हे शारिरीकरित्या दुर्बळ झाल्याच्या चर्चा ऐकायला येत होत्या. खासकरून युक्रेनसोबतच्या युद्धाला सुरुवात झाल्यानंतर पुतीन हे शारिरीक आणि मानसिकरित्या खचल्याच्या आणि सगळ्यासमोर येणारे पुतीन हे ते स्वत: नसून त्यांचे ड्युप्लिकेट असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. पुतीन यांचा हात कंप पावत असून ते थकल्याचे व्हिडीओ प्रसिद्ध झाले होते. पुतीन हे 71 वर्षांचे असून त्यांना आरामाची सक्त गरज असल्याचे सांगितले जाते.

सेक्स पॉवर वाढवण्यासाठी पुतिन रक्ताने आंघोळ करतात, माध्यमांचा खळबळजनक दावा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आरोग्यासंबंधी अनेक वेगवेगळे दावे केले जात आहेत. ते सेक्स पॉवर वाढवण्यासाठी रक्ताने आंघोळ करत असल्याचा दावा एका माध्यमाने केला आहे. रशियात प्रतिबंधित असलेल्या प्रोकेट नावाच्या माध्यमाने हा दावा केला आहे. पुतिन हे हरणांच्या शिंगांना कापल्यानंतर येणाऱ्या रक्ताने ते आंघोळ करतात. तसंच ते थायरॉईड कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्कात असतात, असा दावा करण्यात आला आहे. ही शिंगं सायबेरियन अल्टाय लाल हरणांची असतात. पुतिन यांना अनेक गंभीर आजार असून त्यांनी ही गोष्ट रशियाच्या नागरिकांपासून लपवून ठेवली आहे, असा दावाही माध्यमाने केला आहे.

रक्ताने आंघोळ करणं ही रशियाची प्राचीन परंपरा आहे. सायबेरियन टाइम्सच्या म्हणण्यानुसार, शिंगातील रक्ताने आंघोळ करणं आणि ते रक्त प्राशन करणं ही परंपरा चीन आणि कोरियातही आहे. ही प्रक्रिया महिलांच्या वाढत्या वयाला प्रतिबंध करते आणि पुरुषांची लैंगिक क्षमता टिकवून ठेवायला उपयुक्त आहे.

अल्टाय पर्वतात असणाऱ्या एका फार्मने लाल हरणांच्या शिंगांचा अर्क एक उत्तम टॉनिक असल्याचं म्हटलं आहे. विशेषतः पुरूष आपली सेक्स पॉवर वाढवण्यासाठी शिंगांचा अर्क वापरतात. द सनच्या अहवालानुसार, पुतिन यांची एक मजबूत व्यक्तिमत्वाचा माणूस अशी प्रतिमा गेल्या काही वर्षांत अतिशय नाट्यमय पद्धतीने बदलली आहे. त्यामुळे ते एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.