सदानंद कदम यांची 11 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका

sadanand kadam

दापोली येथील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात ईडीने अटक केलेल्या व्यावसायिक सदानंद कदम यांची अखेर 11 महिन्यांनंतर मंगळवारी तुरुंगातून सुटका झाली. सर्वेच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. त्यानंतर दुसऱयाच दिवशी मुंबई सत्र न्यायालयात जामिनाची पुढील औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सदानंद कदम हे तुरुंगातून बाहेर आले. कदम यांनी 8 डिसेंबर रोजी सर्वेच्च न्यायालयात ’स्पेशल लिव्ह पिटीशन’ दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर सर्वेच्च न्यायालयाने कदम यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला.