संदीप रेड्डी वांगा यांचा आगामी चित्रपट स्पिरिटला बंपर ओपनिंग?

‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा आगामी चित्रपट स्पिरिटची जोरदार चर्चा सुरू आहे. यात सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहे. तब्बल 300 कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट असून पहिल्या दिवशी हा चित्रपट 150 कोटी रुपयांचा गल्ला जमवू शकतो, असा विश्वास संदीप रेड्डी वांगा यांनी व्यक्त केला.