मणिपूर सोडून पंतप्रधान सगळीकडे जातायत! पुणे दौऱ्यावरून संजय राऊत यांची सडकून टीका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यामध्ये येणार आहेत. त्यांच्या या पुणे दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. पंतप्रधान हे मणिपूर सोडून सगळीकडे जातायत असे राऊत यांनी म्हटले. आम्हाला असं वाटतंय की पंतप्रधानांनी मणिपूरला जावं, मात्र ते पुण्याला आले अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

मोदींची कानउघाडणी करा! शरद पवार यांच्याकडे काँग्रेसची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान मोदी यांच्यासह पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी म्हटले की, “शरद पवारांनी अशा कार्यक्रमांना जावे अथवा न जावे हा वादाचा विषय आहे. हा अराजकीय कार्यक्रम आहे. पवारांनी म्हटले की त्यांनी 3 महिने आधी स्वत: पंतप्रधानांना निमंत्रण दिले होते, जर मीच त्या कार्यक्रमाला गेलो नाही तर ते योग्य दिसणार नाही. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पंतप्रधान भ्रष्टाचार संपवू, भ्रष्टाचाऱ्यांसोबत बसणार नाही असे बोलतात. पंतप्रधानांनी भोपाळमधल्या भाजपच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर 70-80 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जण त्यांच्या पक्षासोबत गेले, मग भ्रष्टाचाराविरोधातील तुमचा नारा कुठे गेला? आज तेच सगळे नेते तुमच्यासोबत मंचावर आहेत किंवा तुमच्यासमोर बसले आहे. याचा अर्थ हा होतो की तुम्ही लोकांना घाबरवून आपल्या पक्षात आणताय आणि तुमचे सगळे आरोप खोटे आहेत. तुम्ही म्हटला होता की भ्रष्टाचाऱ्यांसोबत बसणार नाही, मग आता तुम्ही जाहीर करा की हे भ्रष्टाचारी नाहीत म्हणून.

मोदी यांचा रस्त्यावर उतरून विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संजय राऊत यांनी कौतुक केले. मी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि स्वागत करतो, असे राऊत यांनी म्हटले. पवार यांची वेगळी भूमिका आहे. ते विशाल हृदयाचे नेते आहे. ते प्रोटोकॉल पाळतात, त्यांचा अपमान होऊ नये असे त्यांना वाटते. मात्रलोकभावना या पुण्यातील रस्त्यावर दिसत अतील तर लोकशाहीत या भावनेचे स्वागत व्हायला हवे असे त्यांनी म्हटले.

समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग

समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ झालेल्या दुर्घटनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी म्हटले की, “या देशात अमेक महामार्ग निर्माण झाले. मात्र इतके बळी कोणत्याही महामार्गाने घेतले नाहीत. हा महामार्ग निर्माण करताना लोकांच्या सुपीक जमिनी, बागायती शेती या ठेकेदारांच्या फायद्यासाठी ओरबाडून घेतल्या त्याचा हा शाप आहे. लोकं यापुढे महामार्गाचा वापर करायला घाबरतील. “