नगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा आठ दिवसात बंदोबस्त करावा…अन्यथा तीव्र आंदोलन करणार; विक्रम राठोड यांचा इशारा

नगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा येत्या आठ दिवसात बंदोबस्त करावा. याबाबत योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी मनपाला मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्याकरीता अर्ज केला होता. कुत्रे निर्बिजीकरण करण्याकरीता मनपाने ठेकेदार नेमला असून हा खोटे बिले काढण्याकरीता ठेका दिला जात असून साडेपाच लाखांचे दर महिन्याला या ठेकेदाराचे बील काढले जात आहे. वेळोवळी आम्ही सांगूनही मनपा कोणतीच कारवाई करत नाही. तारकपुर परीसरातील दोन व डाळमंडई परीसरातील एकाला कुत्र्यांनी हल्ला करत चावा घेतला आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसात जर यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विक्रम राठोड यांनी दिला आहे.

नगर शहर व उपनगरातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेउन शिवसेनेच्या वतीने युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड व योगिराज गाडे यांनी चर्चा केली यावेळी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, अंबादास शिंदे, राम आहुजा,उमेश काळे, विक्री आहुजा, रिंकु आहुजा, सुहास साळवे, संग्राम कोतकर, शाम वैरागर,प्रिश वाघमारे,अक्षय नागापुरे,कृष्णा आहुजा आदी उपस्थित होते.

विक्रम राठोड म्हणाले आज सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दररोज 30 पेशंट कुत्र्याने चावल्याचे येत आहेत मोकाट जनावरे धरणाऱ्या व मोकाट कुत्र्यांची निर्मिती करणाऱ्या संस्थेला दर महिन्याला 5,50000 लाख रुपयाचे बिल अदा करण्यात येत आहेत आपण नियमित कर भरून जर आपल्या जीवा धोका आहे मनपा भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहे कुत्रे पकडण्याचे खोटे बील काढत आहेत.

योगीराज गाडे म्हणाले की, वयस्कर लोक, लहान मुले यांच्यावर कुत्र्याचे हल्लाचे प्रमाण नगर शहरात वाढले असून यावर प्रशासन काहीच कारवाई करत नाही दोन दिवसात पाच सहा तक्रारी आल्या आहेत महानगरपालीका दर महिन्याला कुत्रे पकडण्याकरीता साडेपाच ते दहा लाख खच करत आहेत कुत्र्याचे हल्ले कमी व्हायला पाहीजे परंतू ते वाढत आहेत त्यामुळे यामध्ये भष्टाचार होत आहे यावर अधिकाऱ्यानी आळा घातला पाहीजे जर हे न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आयुक्ताच्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत.