निवड समितीला वेळ का दिला नाही? निवडणूक आयुक्त निवडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

निवडणूक आयोगाच्या दोन नवीन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला स्थगिती देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. कायद्याला स्थगिती दिल्यास लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अराजकता निर्माण होईल असे न्यायालयाने सांगितले. मात्र, याचवेळी निवडणूक आयुक्तपदासाठीच्या उमेदवारांच्या नावावर विचार करण्यासाठी निवड समितीला वेळ का दिला नाही, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला केला. तसेच यासंदर्भातील नव्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱया याचिकांना 6 आठवडय़ांच्या आत उत्तर देण्याचे आदेशही दिले.

कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाया मुख्य याचिकांवर सुनावणी घेण्याचे आश्वासनही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले. याचिकेची सुनावणी 5 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.