Survery लोकसभा निवडणूकीत महायुतीला धक्का, महाविकास आघाडी उधळणार विजयाचा गुलाल बुक्का

voter-line-maharashtra

इंडिया टुडे व सी व्होटरने संपूर्ण देशातील व महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर एक सर्वेक्षण केलं आहे. त्या सर्वेक्षणानुसार फोडा फोडीचं राजकारण करणाऱ्या भाजप, मिंधे गट व अजित पवार गटाच्या महायुतीला जनता धक्का देऊ शकते. जर आजच्या घडीला महाराष्ट्रात लोकसभा निवडणूका झाल्या तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळू शकतात. सी व्होटर सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 28 जागा मिळू शकतात तर महायुतीला 20 जागा मिळू शकतात.

तसेच देशात देखील आज लोकसभा निवडणूका झाल्या तर त्याचा भाजपला फटका बसताना दिसत आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला देशात 287 जागा मिळणार नाही. 2019 च्या निवडणूकीच्या तुलनेत भाजपच्या तब्बल 49 जागा कमी होऊ शकतात. तर या सर्व्हेनुसार काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार आता जर लोकसभा निवडणूक झाली तर काँग्रेसला 74 जागा मिळू शकतात. हा आकडा 2019 च्या आकड्या पेक्षा जास्त आहे.