‘एआय’ दोन वर्षांत माणसाला मागे टाकेल! एलन मस्कच्या भविष्यवाणीने खळबळ

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) पुढील वर्षी किंवा 2026 पर्यंत मानवांपेक्षाही अधिक बुद्धिमान होईल, अशी भविष्यवाणी टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी केली आहे. नॉर्वे वेल्थ फंडचे सीईओ निकोलाई टांगेन यांना दिलेल्या मुलाखतीत मस्क यांनी ही भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सेक्टरमध्ये एआय कर्मचाऱयांच्या नोकऱयांवर कब्जा करण्याची भीती वर्तवली जात आहे.

एलन मस्क यांच्या एआय स्टार्ट-अप एक्सएआयद्वारे एआय चॅटबॉट ग्रोकला प्रशिक्षण देताना येणाऱया आव्हानांवरही त्यांनी चर्चा केली. प्रगत चिप नसल्यामुळे त्यांना ग्रोकच्या आवृत्ती-2 मॉडेलचे प्रशिक्षण देण्यात अडचणी आल्या, असेही मस्क यावेळी म्हणाले. ग्रोक आवृत्ती 2 मॉडेलला प्रशिक्षण देण्यासाठी अंदाजे 20,000 एनविडीया एच100 जीपीयूला लागले. यानंतर ग्रोक मॉडेल 3 आणि त्यानंतरच्या मॉडेल्सना 1 लाख एनविडीया एच100 चिप्स लागतील. चिपच्या कमतरतेव्यतिरिक्त मस्क यांनी एआय विकासासाठी वीजपुरवठा हा एक मोठा अडथळा असल्याचेदेखील नमूद केले. येत्या एक-दोन वर्षांत वीजपुरवठाही महत्त्वाचा होईल, असेही मस्क म्हणाले. ओपन एआयची स्थापना डिसेंबर 2015 मध्ये मस्क यांनी सॅम ऑल्टमन, ग्रेग ब्रॉकमन, इल्या सुत्स्केव्हर, जॉन शुलमन आणि वोज्शिच झारेम्बा यांच्यासोबत केली होती. ज्या कंपनीने चॅट जीपीटी तयार केली ती ओपन एआय आहे.

टॉप एआयकंपन्या

सध्या एआयचे चॅटजीपीटी आणि गुगलचे बार्ड या दोन मोठय़ा एआय कंपन्या आहेत. चॅट जीपीटी आणि बार्डला कोणताही प्रश्न विचारू शकता. ईमेल कसा लिहावा इथपासून ते सीव्ही कसा तयार करावा इथपर्यंत. रील किंवा व्हिडीओ कसा व्हायरल करावा याची माहितीसुद्धा एआय कंपन्या देतात. चॅटजीपीटी इतके पुढे गेले आहे की, पत्नीसाठी कोणती भेटकस्तू घ्यायला हकी, याबाबत सूचनाही देते. किद्यार्थ्याला लोकशाही कर निबंध लिहायचा असेल, तर तो लगेच चॅटजीपीटीकर टाईप करेल. काहीही चॅटजीपीटीकर उपलब्ध होते. भकिष्यात एआय माणसाला आक्हान देईल.