भाजपचे बियाणेच बोगस! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

आज जे तुम्ही करताय ते उद्या बुमरँगसारखं तुमच्यावर उलटणार आहे. आम्ही निर्दयीपणे वागायचे ठरवले. तुमच्या घरगडय़ासारख्या वागणाऱ्या यंत्रणा तुमच्यावर सोडल्या आणि तुमच्या घरात येऊन ती लोकं घुसली तर तुम्ही कुठे पळाल? तुम्ही एवढं गडगंज खालेलं आहे की तुम्हाला ते लवपायलाही जागा नाही.

मोदी तुमचे उत्पन्न दुप्पट करणार होते, झाले का? पीक विमा योजना मिळाली का? तुम्हाला बियाणे तरी अस्सल मिळते का? असे प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना विचारले तेव्हा ‘नाही’ असा सूर गर्दीतून उमटला. तोच धागा पकडत उद्धव ठाकरे कडाडले. ‘भाजपमध्येच अस्सल काही नाही तर ते शेतकऱयांना अस्सल बियाणे काय देणार. भाजपमध्ये सगळी माणसे बाहेरून घेताहेत. भाजपचे बियाणेच बोगस आहे, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

हिंगोली मतदारसंघातील उमरखेड आणि नांदेड येथे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रखरखत्या उन्हात जनसंवाद सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मिंधे आणि भाजपवर तोफ डागली. शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी आंदोलन करत आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याला अराजक म्हणतोय! हमीभाव देणार नाही, कर्ज माफ करणार नाही. न्यायासाठी रस्त्यावर उतरणारे तुम्ही अतिरेकीच आहात! अराजक पसरवत आहात! शेतकरी अतिरेकी, हीच मोदी सरकारची गॅरंटी! अन्नदाता त्याच्या कष्टाचे मोल मागत असेल आणि त्याला तुम्ही अराजक म्हणत असाल तर चुलीत घाला तुमचे ते भाडोत्री हिंदुत्व, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुनावले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजक सुरू असल्याचा जावईशोध लावला. होसबळे यांच्या विधानाचा समाचार घेताना उद्धव ठाकरे कडाडले, शेतकरी त्याच्या कष्टाचे मोल मागतो आहे. त्याच्या मागणीला अराजक म्हणत असाल तर तुमचे हिंदुत्व तुम्हालाच लखलाभ असो. इकडून तिकडून भाडोत्री जमाच करताहेत. यांचे हिंदुत्वही भाडोत्रीच. शेतकऱयांना न्याय देऊ शकत नसाल तर चुलीत घाला तुमचे ते भाडोत्री हिंदुत्व! तुमच्या या बोगस हिंदुत्वाला कवडीचीही पिंमत नाही.

शासन आपल्या दारी अन् मिंधे भाजपच्या दारी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा डेरेदार वृक्ष फुलवला! हा पक्षच चोरला. शिवसेनाप्रमुखांना अत्यंत प्रिय असलेला धनुष्यबाण चोरला. तरीही शिवसेना पुन्हा नव्या रसरसलेल्या चैतन्याने उभी राहतेय. जिथे मी जातोय तिथे गर्दी उसळते. हे पाहून यांची पोटदुखी दररोज वाढते. मी घरी बसून राहिलो, असा आरोप करणारांनी बघावं हे भगवे तुफान! घरी बसून असतो तर कशाला जमली ही गर्दी! शासन आपल्या दारी आणि मिंधे भाजपच्या दारी! कठपुतळी! शिवसेना आपल्या हातातली कठपुतळी होणार नाही हे लक्षात आल्यानंतरच पह्डापह्डीला उैत आला. निष्ठsवर पाणी टाकून गद्दार खोक्यात गेले, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

चंदा दो, धंदा लो
निवडणूक रोख्यांवर बोलायला भाजपला बूच बसलेय. सत्तेची हाव, जुलूम, जबरदस्ती दुसरे काय! नंबर दोनचे रोखे घेणाऱया मेघा इन्फ्रास्ट्रक्चर पंपनीचा अचानक कसा काय उदय झाला? कुठून आली ही पंपनी? या पंपनीला सरकारी कामाचे टेंडर देण्याच्या तारखा आणि निवडणूक रोखे भाजपला देण्याच्या तारखा जवळपास सारख्याच आहेत. नांदेड परिसरात या पंपनीला हजारो एकर जमीन दिल्याचे सांगितले जाते. मुंबई महापालिकेतही प्रशासक आल्यानंतर मेट्रोची कामे देण्यात आली. सगळीकडे उधळपट्टी होतेय. आम्हालाही रोखे मिळाले. आम्ही ते जाहीर करू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोना काळात हे

सरकार पाडत होते
सगळे जग कोरोनाशी संघर्ष करत होते. याच काळात मी महाराष्ट्र तळहाताच्या पह्डाप्रमाणे जपला. सगळे काही बंद होते. फक्त शेतीची कामे सुरू होती. माणूस जगण्यासाठी संघर्ष करत असताना भाजप मात्र मध्यप्रदेशात कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात व्यस्त होता. ते सरकार पाडल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांना खुर्चीत बसवले आणि नंतर मध्यप्रदेशात लॉकडाऊन झाले. ही राजकीय विकृतीच आहे. जनता मरतेय, मरू दे! आम्हाला फक्त सत्ता, खुर्ची पाहिजे अशी यांची मानसिकता, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

पीकविमा, अतिवृष्टी, गारपिटीचे अनुदान शेतकऱयांना अजूनही मिळाले नाही. मात्र दुसरीकडे खोक्यांचे राजकारण करून आमदार पह्डापह्डी मात्र जोरात चालू आहे. मोदींच्या नावावर मते मिळत नाहीत, ठाकरेंच्या नावावर मिळतात. म्हणून त्यांचा पक्ष चोरायचा, चिन्ह चोरायचे. पण लोकांना ही बनवेगिरी कळून चुकली आहे. त्यामुळे या थापेबाजांना आता जनताच धडा शिकवणार, असा आत्मविश्वास या वेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राज्य संघटक एकनाथ पवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख माधव पावडे, प्रमोद खेडकर, बबन बारसे, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, अनुसया खेडकर, लातूरचे संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, सहसंपर्कप्रमुख दत्ता कोकाटे, भुजंग पाटील, डॉ. मनोजराज भंडारी उपस्थित होते.

कितीही खाल्लं तरी मिंध्यांची भूक भागतच नाही
काय कमी केलं होतं मी यांना. आमदार केले, खासदार केले. त्या मिंध्याला तर सगळय़ात महत्त्वाचे खाते दिले. कितीही खाल्ले तरी यांची भूकच शमत नाही, भस्म्या रोग जडलाय या गद्दारांना! मी मुख्यमंत्री असताना हिंगोलीसाठी हळद प्रकल्प मंजूर केला आणि इथला खासदार इकडची हळद लावून तिकडच्या बोहल्यावर चढला! काँग्रेस नेते राहुल गांधी परवा बोलले. तुम्ही ओळखलंच असेल कोण ते! सोनियांकडे गेले, रडले. म्हणाले, काय करू मी. एवढं खाल्लंय, आता तुरुंगात जावे लागेल! आता मी तुरुंगात जाऊ शकत नाही. त्यापेक्षा तिकडे जातो. यालाच म्हणतात हुकूमशाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स मागे लावणार… तुरुंगात जा नाहीतर भाजपमध्ये या पिंवा मिंधेकडे जा, असे अनेकांना धमकावले जातेय. एखादाच संजय राऊत असतो. तो हिंमत दाखवतो. याला म्हणतात निष्ठा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच टाळय़ांचा कडकडाट झाला.

तुमच्या सात पिढय़ांचा इतिहास मांडा…
अमित शहा म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत काहीच ठरले नव्हते. अडीच वर्षे सत्तेचे समान वाटप, असा काही शब्द दिलेला नव्हता. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत काय घडले, हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितले आहे. माझ्या आई-वडिलांची शपथ घेतली. मी खोटं बोलतोय असे भाजपवाले म्हणतात. अमित शहा, मोदी मांडा तुमच्या सात पिढय़ांचा इतिहास, मीदेखील सांगतो. बघू महाराष्ट्रातील जनता कोणाला ओळखते. तुमच्यापेक्षा महाराष्ट्र ठाकरेंना जास्त ओळखतो, असा हल्लाबोल करत उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहांच्या खोटारडेपणाचा बुरखा टराटरा फाडला. गेल्या दहा वर्षांपासून मोदी सांगताहेत, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करू आणि आणखी काय काय. मोदींनी दिलेला कोणता शब्द पाळला, कोणते आश्वासन पूर्ण केले, असा थेट सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

बेरोजगारांना नाही, पण गद्दारांना रोजगार मिळाला
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात भाजपच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला. भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई दूर करणार या मोदींच्या केवळ थापा ठरल्या. 2014 पूर्वी चांगले दिवस होते. ते पुन्हा मिळवण्यासाठी या सरकारला गाडण्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले. दोन कोटी रोजगार हे सरकार देणार होते. जय शहा, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि इतर गद्दारांना खोक्यातून रोजगार मिळाला. पण बेरोजगार अजूनही रोजगाराच्या शोधात फिरतोय, अशी टीका त्यांनी केली.

गद्दाराकडून ऊस उत्पादकांचा छळ
शेतकऱयांनी कष्टाच्या पैशाचा शेअर गोळा करून वसंत सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. तो कारखाना ठाण्यातील खासदाराच्या भागीदारीत गद्दार खासदार हेमंत पाटील यांनी विकत घेऊन ऊस उत्पादकांचे हाल चालविले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. स्थानिक आमदाराने नगर परिषदेत कचरा घोटाळा केल्याचेही ते म्हणाले.

भाजप डायनासॉरसारखा!
देशात आज कुणीच, अगदी भाजपचा कार्यकर्ताही खूश नाही. गुजरातमधल्या भाजपच्या एक महिला अध्यक्षाने राजीनामा दिला. त्या ताईंनी जे सांगितले ते महत्त्वाचे आहे. भाजप डायनासॉरसारखा आहे. त्याच्या शेपटाला काही लावले तर मेंदूपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो, असे त्या म्हणाल्या. 38 वर्षे त्या भाजपात होत्या. त्यांचे हे मत आहे, असे सांगत भाजपच्या कारभाराची उद्धव ठाकरे यांनी चिरफाड केली.

आणखी एक ठाकरे आताचोरण्याचा भाजपकडून प्रयत्न
महाराष्ट्रामध्ये मते हवी असतील तर मोदी या नावावरती मिळू शकत नाहीत. ठाकरे या नावावरतीच मते मिळतात, हे भाजपला कळून चुकले आहे म्हणून त्यांनी बाळासाहेबांचा फोटो चोरला. आणखी एक ठाकरे आता चोरण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. खुशाल घ्या. मी आणि माझी जनता पुरेशी आहे तुमचा पाडाव करायला, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.