दादरच्या खोदादाद सर्कल, कोतवाल उद्यानात होणार भूमिगत पार्किंग; पालिका खर्च करणार 100 कोटी

दादरच्या खोदादाद सर्कल आणि कोतवाल उद्यानामध्ये पालिका अद्ययावत सुविधा असणारे भूमिगत पार्किंग उभारणार आहे. यासाठी 100 कोटींचा खर्च केला जाणार आहे. दरम्यान, गार्डनमध्ये भूमिगत पार्किंग उभारताना रस्त्याखाली केबलसह इतर युटिलिटीजला धक्का न लागता हा उपक्रम राबवण्यासाठी पालिकेने रस्ते विभागाला अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईत दररोज वाढणाऱया वाहन संख्येमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. यामध्ये बेशिस्तपणे वाहन पार्किंग केली जात असल्यामुळे ही समस्या वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका उद्यानांमध्ये भूमिगत पार्किंग सुविधा सुरू करण्याची योजना राबवत आहे. यानुसार जागांचा शोध पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. मात्र भूमिगत मार्केट उभारण्यात रस्त्याखालील युटिलिटीजचा अडथळा समोर आला आहे. एमटीएनएल, महानगर गॅस, पालिकेच्या पाण्याच्या पाईप लाईन, मलनिःसारण जलकाहिनी, पर्जन्य जल काहिनी आदी प्राधिकरणाच्या केबल क पाईप लाईन रस्त्याखाली आहेत. त्यामुळे युटिलिटीजला धक्का न लावता ही मार्केट उभारण्यात येणार आहेत. रस्ते किभागाकडे प्रस्ताक पाठकिला असून रोड किभागाचे सल्लागार पॅनल याबाबत अभ्यास करून अहकाल सादर करणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दिल्लीच्या धर्तीवर राबवणार उपक्रम
– पालिका भूमिगत मार्केट हे दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये असलेल्या भूमिगत मार्केटच्या धर्तीवर बनवण्यात येणार आहेत. हा बाजार नवी दिल्लीच्या व्यावसायिक आणि आर्थिक केंद्रांपैकी एक आहे. या ठिकाणी शॉपिंग, नाईटलाइफ आणि पर्यटन हे आकर्षण आहे. या बाजारात 380 स्टोअर्स आहेत. बाजार पूर्णपणे कातानुकूलित आहे. या पालिका बाजाराची स्थापना 1970 च्या उत्तरार्धात झाली आणि तेव्हापासून ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.