गंभीर-आफ्रिदी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; कधी, कुठे रंगणार सामना, वाचा सविस्तर…

टीम इंडियाचा माजी विस्फोटक खेळाडू गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हे मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोघांमध्ये अनेकदा तूतू-मेमे झाल्याचे आपण याआधीही पाहिले आहे. आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा या दोघांमधील टशन पहायाला मिळणार आहे. दोघेही क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. निमित्त आहे यूएस मास्टर टी-10 लीगचे.

अमेरिकेमध्ये उद्यापासून (18 ऑगस्ट) यूएस मास्टर टी-10 लीगची सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारे, विकेटचे विक्रम रचणारे खेळाडू अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा जोर आजमावताना दिसणार आहे. या लीगमध्ये गौतम गंभीर, जॅक कॅलिस, क्रिस गेल, रॉस टेलर, सुरेश रैना, शाहिद आफ्रिकी, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग, युसून पठान हे खेळाडू खेळताना दिसतील.

गंभीर-आफ्रिदीवर लक्ष

यूएस मास्टर टी-10 लीगमध्ये सर्वांचे लक्ष गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदीकडे असणार आहे. गंभीर न्यूजर्सी ट्रायटन्स संघात, तर आफ्रिदी न्यूयॉर्क वॉरियर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे.

कुठे आणि कधी पाहू शकता सामना?

टी-10 ग्लोबर स्पोर्टस आणि सॅम्प आर्मी फ्रेंचायझीने या लीगचे आयोजन केले आहे. 18 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान फ्लोरिडाच्या मैदानावर ही लीग खेळली जाईल. या लीगमध्ये प्रत्येक दिवशी तीन सामने रंगतील. पहिला सामना हिंदुस्थानी वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता, दुसरा सामना रात्री 8.45 वाजता आणि तिसरा सामना 10.45 वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्टस 1 आणि स्टार स्पोर्टस हिंदी चॅनेलवर क्रीडाप्रेमी याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतील.

इंग्लंडचा मास्टरस्टोक्स; जगज्जेतेपद राखण्यासाठी निवृत्त बेन स्टोक्स परतला

काय आहे फॉरमॅट?

यूएस मास्टर टी-10 लीगमध्ये न्यू जर्सी ट्रायटन्स, अटलांटा रायडर्स, कॅलिफोर्मिया नाईट्स, मॉरिसविले युनिटी, न्यूयॉर्क वॉरियर्स आणि टेक्सास चार्जर्स हे सहा संघ भाग घेतील. प्रत्येक संघ आपापसात एकदा भिडेल. राऊड रॉबिन पद्धतीने 21 सामने खेळले जातील. यातील टॉपचे चार संघ प्ले ऑफमध्ये पोहोचतील. ग्रुप स्टेजमधील टॉप 2 संघांमध्ये फायनलसाठी क्वालिफायर 1 सामना होईल, तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघात एलिमिनेटर सामना रंगेल. क्वालिफायर 1 मध्ये जिंकणारा संघ फायनलमध्ये तर हरणारा संघ एलिमिनेटर लढतीतील विजेत्या संघाशी भिडेल.

पृथ्वीला शॉक; गुडघ्याच्या दुखापतीमुळे वन डे कपमधून बाहेर