नगरच्या ईदगाह मैदानात पॅलेस्टाईनचा झेंडा

नगरच्या ईदगाह मैदानात पॅलेस्टाईनचा झेंडा लावण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहे. शहरातील कोठला परिसरात असलेल्या एका मैदानाच्या संरक्षण भिंती लगत असलेल्या महापालिकेच्या विद्युत खांबावर पॅलेसस्टाईन झेंडा विनापरवाना लावल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच झेंडा याप्रकरणी महापालिकेचे कर्मचारी मुजमील राजू पठाण यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

नगर शहरात लावण्याचे कारण काय रमजान ईदच्या आदल्या दिवशी आणला किंवा नगरमध्ये तयार केला गेला का? अशा विविध प्रश्नांची चर्चा शहरात सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, रमजान ईदमुळे गोठला येथील इतका मैदानाची साफसफाई बुधवारी करण्यात आली. याच मैदाना लगत असलेल्या एका विद्युत खांबाचा आजार घेत पॅलेस्टाईनचा झेंडा लावण्यात आला होता. हा झेंडा कोणी कधी आणि केव्हा लावला, याची माहिती नाही. परंतु कोतवाली पोलिसांनी याची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी शोध पोलीस कर्मचारी आणि भागातील कर्मचाऱ्यांना मैदानाकडे रवाना केले.

पोलिसांनी हा झेंडा तत्काळ खाली उतरवून घेतला. हा झेंडा खूप मोठा होता कोतवाली पोलिसांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि शहर पोलीस उपाधीक्षक अनिल भारती यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली आहे.