शेतकऱयांना नाबार्डकडून थेट कर्ज दिले जात नाही 

दुग्ध उद्योजकता विकास योजनेंतर्गत नाबार्ड दुग्ध व्यवसायांसाठी शेतकऱयांना थेट कर्ज देत असल्याचा दावा खोटा असून शेतकऱयांना नाबार्ड कधीही थेट वैयक्तिक कर्ज देत नाही, असे नाबार्डच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. नाबार्डच्या नाबार्ड डेअरी कर्ज योजनेबद्दल सध्या अफवा पसरण्यात येत आहेत. एक सर्वोच्च विकास वित्त संस्था असलेली नाबार्ड ग्रामीण विकासाशी संलग्न असलेल्या विविध वित्तीय संस्था आणि सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य आणि पाठबळ देण्याचे कार्य करते. शेतकऱयांना वैयक्तिकरित्या नाबार्ड कधीही थेट कर्ज वितरित करत नाही, असे नाबार्डने स्पष्ट केले आहे.