मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावे; ममता बॅनर्जी यांचा प्रस्ताव

इंडिया आघाडीची चौथी आणि महत्त्वाची बैठक मंगळवारी नवी दिल्लीत झाली. या बैठकीला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थइत होते. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. संसदेत झालेली घुसखोरी, खासदारांचे निलंबन, ईव्हीएम या मुद्द्यांसोबतच इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबतही महत्त्वाची चर्चा झाली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत राज्य स्तारवर चर्चा होईल. त्यात काही अडचणी आल्या तर आम्ही एकत्र बसून त्यातून मार्ग काढू, असे खरगे यांनी सांगितले. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र बसत जागावाटपाबाबत 31 डिसेंबर 2023 पर्यंत चर्चा पूर्ण करावी, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

या प्रस्तावर खरगे म्हणाले की, आधी आम्हाला 2024 च्या लोकसभा निवडणुकाय जिंकायच्याच आहेत. त्यासाठी तयारी सुरू करा. पंतप्रधानपदाचा चेहरा किंवा पंतप्रधानपदाचा उमेदवार यावर नंतर चर्चा करता येईल. मात्र, आपल्याला विजय मिळवायचाच आहे, असे खरगे म्हणले.