अभिनेत्री शिवानी सुर्वे अडकली लग्नबंधनात, अजिंक्य ननावरेसोबत बांधली लग्नगाठ

प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वे ही तिचा बॉ़यफ्रेंड व अभिनेता अजिंक्य ननावरे यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. ठाणे येथे शिवानी व अजिंक्य यांचा विवाहसोहळा पार पडला.

अजिंक्य व शिवानी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र ते लग्न करणार याची काहीच चर्चा नसताना अचानक 31 जानेवारीला शिवानी व अजिंक्यने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले. तिच्या साखऱपुड्याच्या फोटो व्हायरल होताच अनेकांना धक्का बसला. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवानीच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओज व्हायरल झाले. 1 फेब्रुवारी रोजी शिवानी व अजिंक्यचा विवाहसोहळा त्यांचे कुटुंबीय व काही सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडला.

शिवानी-अजिंक्यच्या लग्नाला माधव देवचक्के, नेहा शितोळे, मेघा धाडे, कुशल बद्रिके अशा मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. तसेच शिवानीचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट झिम्मा 2 च्या संपूर्ण स्टारकास्टने तिच्या लग्नाला हजेरली लावली होती.