अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले अडकले लग्नबंधनात

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेतील मुख्य अभिनेत्री योगिता चव्हाण व मुख्य अभिनेता सौरभ चौघुले लग्नबंधनात अडकले आहेत. योगिता व सौरभने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावर अंतरा-मल्हारची जोडी हिट झाली होती. हे दोघे सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो व रिल शेअर करत असायचे. या दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबूली कधीच दिली नव्हती. मात्र रविवारी अचानक योगिताने तिच्या सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.