चिपळूणच्या अभिनेत्रीचं IPL साठी अँकरिंग

‘देवमाणूस’ मालिकेत झळकलेली अभिनेत्री ऐश्वर्या नागेश आता अभिनय सोडून पुन्हा अँकरिंगकडे वळली आहे. सध्या ती प्लॅनेट मराठी या सोशल वाहिनीसाठी न्यूज अँकरिंगचं काम करत आहे. या माध्यमातून ऐश्वर्याने आतापर्यंत अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पण आता ऐश्वर्याला प्रथमच आयपीएलसाठी अँकरिंग करण्याची संधी मिळाली आहे.