शिंदेंना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याचा भाजपचा कट; अनिल परब यांचा हल्लाबोल

महायुतीतील जागावाटपावारून शिवसेना आमदार ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते अनिल परब यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. ‘निगेटिव्ह सर्व्हे दाखवत शिंदे गटाच्या जागा कमी केल्या जाताहेत. शिंदेंना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याची भाजपची स्ट्रॅटेजी आहे’, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे. अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. ‘भाजप सोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांची तिकिटं कापली गेली. आपल्या सोबत आलेल्या एकाही नेत्याचं नुकसान झालं तरी राजीनामा देईन, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आता मुख्यमंत्री शिंदे काय करणार?’ असा थेट प्रश्न अनिल परब यांनी केला आहे.

भाजप स्ट्रॅटेजी करून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. हे मी सांगण्याची गरज नाही. अलीकडे घडलेल्या सर्व घडामोडी बघा. ठाणे आणि कल्याण या लोकसभा मतदारसंघांवर तडजोड होऊ शकते का? आता कल्याणच्या जागेचा उमेदवार हा फडणवीसांनी जाहीर केला. मग महायुती नाशिक मतदारसंघाचा उमेदवार का जाहीर करत नाही? असा सवाल उपस्थित करत शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरेंसमोर तुम्ही मातोश्रीवर नाक रगडलं होतं; संजय राऊत यांचा अमित शहांना भीमटोला

सोयीप्रमाणे कल्याणचा उमेदवार जाहीर केला. आता ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपने अडकवली आहे. यामुळे शिंदे गटाला ठाण्याची जागा मिळते की नाही? हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल, असे म्हणत अनिल परब यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला.

मंडलिकांनी कोल्हापूरच्या गादीचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही; संजय राऊत यांचा इशारा

ज्या पद्धतीने जागावाटप सुरू आहे, ते पाहा. दिल्लीत जाऊन अमित शहांना आणि इथे देवेंद्र फडणवीसांना सांगू शकेल की,  युती तुटली तरी चालेल पण हे करणार नाही, असं सांगण्याची यांच्यापैकी कोणात हिंमत आहे का? असा सवाल करत अनिल परब यांनी शिंदे गटाला टोला लगावला.