मुंबईला काय हवे ते मुंबईकर ठरवतील, दिल्ली नाही! मिठागरातील पुनर्वसनाच्या नावाखाली भाजपकडून झोपडपट्टीवासीयांना बेघर करण्याचा डाव

मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याच्या नावाखाली गोरगरीब कष्टकऱ्यांना बेघर करून पुनर्विकासात मिठागरे भाजपच्या मित्रांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. काही झाले तरी पुनर्विकासात झोपडपट्टीवासीयांना आहे त्याच ठिकाणी घर मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडत, ‘मुंबईला काय हवे ते मुंबईकरच ठरवतील, दिल्ली नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उत्तर मुंबई मतदारसंघासाठी उमेदवारी मिळालेले माजी केंद्री य रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सर्व झोपडपट्टीवासीयांना मिठागरांत घरे देण्याची संकल्पना एका मुलाखतीदरम्यान नुकतीच मांडली. याचा आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. मुंबईतील मिठागरे ही भाजपच्या मित्रांच्या घशात टाकायची आणि मुंबईतील गोरगरीब इलेक्टोरल बॉण्ड्स विकत घेऊ शकत नाही म्हणून त्यांना बेघर करायचे, अशी भाजपची नीती असल्याचे ते म्हणाले. 2022 मध्ये भाजपकडून सर्वांना घर देण्याची घोषणा करण्यात आली होती. 2017 च्या निवडणुकीआधी झोपडपट्टय़ांमध्ये फॉर्मही वाटण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले? यातील एकालाही अद्याप घर मिळाले नसल्याचेही ते म्हणाले. धारावी आणि जुहू परिसरासाठी केलेल्या घोषणाही फसव्या निघाल्याची भंडापह्डही त्यांनी केली. मिठागरांत घरे बांधल्यास पर्यावरणालाही हानी पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पीयूष गोयल यांची भूमिका गोरगरीबांसाठी भीतिदायक असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, कोरोना काळात कर्फ्यू लागताच इतर राज्यांतील कामगारांना घरी जाण्यासाठी ट्रेन सोडण्याची मागणी आम्ही केली, मात्र तत्कालीन रेल्वेमंत्री गोयल यांनी ही मागणी मान्य केली नाही. यानंतर स्थिती भयानक झाली. रुग्ण वाढले. कामगारांचे हाल होत होते. त्यावेळी महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅम्प सुरू करून या कामगारांना आधार दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदप्रसंगी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.

तेव्हा मुंबईच्या विकासात खडा टाकला

कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड बांधण्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्णय घेण्यात येत होता. तेव्हा केंद्राने याला नकार देत मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकण्याचे काम केले, तर आपली सत्ता येताच कांजूरमार्गमध्येच मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्याचा टोलाही त्यांनी लगावला. गेल्या दहा वर्षांत मुंबईचा केवळ अपमान करण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे. इथले जे चांगले असेल ते आपल्या राज्यात पळवायचे आणि मुंबईचा अपमान करायचा असेच धोरण सुरू आहे.

भाजपचा नारा गरिबी हटाव, नाही तर गरीब हटाव

झोपडपट्टय़ांमधील गोरगरीबांचे छोटे-मोठे व्यवसाय, रोजगार, नोकऱ्याही जवळच असतात. देशाच्या विकासात त्यांचा प्रमुख वाटा असतो. त्यांना जर मिठागरांत नेऊन सोडले तर त्यांचा व्यवसाय बुडणार आहे. त्यामुळे जिथे झोपडी तिथेच घर मिळाले पाहिजे, अशी मागणी करीत भाजपच्या भूमिकेचा निषेध केला. गोयल यांच्या घोषणेमुळे भाजपच्या मनातील सत्य समोर आले असून भाजपचा नारा ‘गरिबी हटाव’ नाही तर ‘गरीब हटाव’ असा असल्याचा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.

‘विकसित भारत’मध्ये गोरगरीब, झोपडपट्टीवासीयांचा वाटा सर्वाधिक असतो. मात्र जिंकून आल्यावर मिठागरात पाठवण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र ही हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही.

आदित्य ठाकरे, शिवसेना नेते

काँक्रीटीकरण बारगळले

रस्त्यांसाठी नोव्हेंबर 2022 मध्ये 397 किमीच्या 910 रस्त्यांच्या कामांसाठी 6,078 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. त्यानुसार पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली होती. मात्र अद्याप रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत.

असे होतेय काम

खड्डेमुक्तीसाठी जानेवारी 2023 मध्ये पाच पंपन्यांना वर्क ऑर्डर दिली. मात्र शहरातील रस्ते सिमेंट काँप्रीटचे करण्याकडे कंत्राटदाराने पाठ फिरवल्याने आजपर्यंत शहरातील सिमेंट काँप्रीटच्या रस्त्यांच्या कामाला मुहूर्त सापडलेला नाही.

तर पूर्व व पश्चिम उपनगरातील  काँप्रीटच्या रस्ते कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे सिमेंट काँप्रीटच्या 910 कामांपैकी फक्त 123 कामे सुरू झाली असून  787 कामांना सुरुवातही झालेली नाही.