पोटातून काढले 6.2 कोटीचे कोकेन

व्हेनेझुएला येथून मुंबईत आलेल्या एका पुरुष प्रवाशाने पोटात लपवून ठेवलेले 6.2 कोटींचे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय)ने जप्त केले. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या प्रवाशाच्या पोटातून ते कोकेनच्या कॅप्सूल बाहेर काढल्या. पोटातून ड्रग तस्करीची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे.

परदेशातून एक जण ड्रग घेऊन येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्या माहितीनंतर तीन दिवसांपूर्वी डीआरआयच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला. संशयित प्रवाशाची चौकशी केल्यावर त्याने पोटातून ड्रग  असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्याला अटक करून जे जे. रुग्णालयात दाखल केले. जे. जे. तील डॉक्टरांनी त्याचा पोटाचा एक्सरे काढला. त्या प्रवाशाच्या पोटात काही संशयास्पद वस्तू दिसल्या. डॉक्टरांनी त्याच्या पोटातून एकूण 57 कॅप्सूल बाहेर काढल्या.