ऑन डय़ुटी दारू ढोसली, कांजुरमार्ग पोलीस ठाण्यातील अंमलदार निलंबित

liquor Liqueur
प्रतिकात्मक फोटो

गैरवर्तणूक व बेशिस्तपणा केल्यामुळे भांडुप पोलीस ठाण्यातील चौघा अंमलदारांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता कांजूरमार्ग पोलीस ठाण्यातील एक अंमलदार ऑन डय़ुटी दारू ढोसलेल्या अवस्थेत सापडल्याने त्याच्यावरदेखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

रामचंद्र सरोदे असे कारवाई झालेल्या अंमलदाराचे नाव आहे. सरोदे हे कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 23 तारखेला सरोदे हे रात्रपाळी कर्तव्यावर असताना त्यांची नेमणूक मोबाईल-1 या महत्त्वाच्या वाहनावर करण्यात आली होती. मात्र ऑन डय़ुटी वर्दीत असताना सरोदे दारू ढोसून होते. हा प्रकार बेशिस्त, बेजबाबदारपणाचा असून यामुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होणारी आहे. परिणामी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरोदे यांच्या या कृत्याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  दरम्यान, पोलीस निरीक्षकाच्या कक्षात बेशिस्त व गैरवर्तणूक केल्याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यातील चार अंमलदारांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सुनील पंक, शैलेश पाटोळे, मनोहर शिंदे, प्रेमचंद सावंत अशी त्या चौघा अंमलदारांची नावे आहेत. या चौघांची वर्तणूक बेशिस्तपणाची होती. त्यांच्याविरोधात बऱ्याच तक्रारी यायच्या. समज देऊनही त्यांचे वर्तन सुधारत नव्हते. त्यामुळे चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.