Photo – ‘हास्यजत्रा फेम’ अभिनेत्रीचे पतीसोबत मालदीवमध्ये रोमँटीक फोटोशूट

अभिनेत्री चेतना भट महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचली आहे. चेतनाने नाटके तसेच चित्रपटांतही काम केले आहे. सध्या चेतना तिचा पती मंदार चोळकर सोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. चेतनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मालदीव ट्रिपचे काही रोमँटिक फोटोस शेअर केले आहेत. या दोघांचे हे फोटोस सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

‘Maldives Diaries’ असे कॅप्शन देत चेतनाने हे फोटोस इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याचसोबत #KadhiGoadKadhiTikhat असा हॅशटॅग देखील दिला आहे.