‘हमास’ नावाची ही भानगड आहे तरी काय ? वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांत इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हमास यांच्यात पुन्हा संघर्षाला सुरुवात झाली आहे. या संघर्षात शनिवारपर्यंत पॅलेस्टाईनमधील 119 जणांचा मृत्यू झालाय, तर हमासच्या हल्ल्यात इस्रायलमधील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जो संघर्ष सुरू झाला आहे त्याची सुरुवात जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीमध्ये जमलेल्यांवर इस्रायली पोलिसांनी बळाचा वापर केल्याने झाली होती.

al-maqsa-violence

जेरुसलेम भागावर इस्रायलने आपला अधिकार सांगितला असून तेथील पॅलेस्टीनी नागरिकांना ते हाकलून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. पॅलेस्टाईनवासी आणि हमास यामुळे चिडली असून तिने इस्रायलला धडा शिकवण्यासाठी सोमवारी क्षेपणास्त्रे डागली होती. यामुळे संतापलेल्या इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या म्होरक्यांवर, कार्यालयांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे.

gaza-demolished-bildings

शुक्रवारी इस्रायलने हमासने गाझा शहरात तयार केलेल्या बोगद्यांचे जाळे उध्वस्त केल्याचे सांगितले जात आहे. बोगद्यांचे हे जाळे हमासने इस्रायली सैनिकांचा घात लावून खात्मा करण्यासाठी तसेच हल्ला झाल्यास ये-जा करण्यासाठी तयार केले होते. इस्रायलसारख्या देशाशी झुंजणारी ही हमास नेमकी आहे तरी काय आपण पाहूयात.

hamas

हमास ही पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना आहे. हरक अल मुकवमाह अल इस्लामिया असं या संघटनेचं नाव असून प्रत्येक शब्दाचे पहिले इंग्रजी अक्षर जोडून हमास असं लहान नाव या संघटनेने धारण केले आहे. सुन्नी मुसलमानांनी एकत्र येऊन हमासची स्थापना केली आहे. इस्रायलच्या पश्चिमेकडे असलेल्या गाझा पट्टीवर हमासचं नियंत्रण आहे. इस्रायलने हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी याच गाझा पट्टीवर हल्ले केले आहेत. हमास या संघटनेमध्ये दोन भाग आहेत. पहिल्या उपशाखेचं नाव ‘दवाह’ असं असून ती सामाजिक कार्य करते. दुसऱ्या उपशाखेचं नाव ‘इझ अद दिन अल कासमी’ असं असून ही उपशाखा सशस्त्र दल आहे.

हमासचा इतिहास

1987 साली इस्रायलच्या विरोधात गाझा, वेस्ट बँक आणि इस्रायलमधल्या काही ठिकाणी पॅलेस्टीनी नागरिकांनी उठाव केला होता. याला पहिला ‘इंतिफादा’ असं म्हटलं जातं. इंतिफादाचा अरबी भाषेतला शब्दश: अर्थ झटकून हादरा देणे असा होता.

intifada

पॅलेस्टीनी लोकांनी इस्रायलच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी हा उठाव केला होता. त्याकाळी हमास ही नव्याने उदयास आलेली संघटना होती. ही संस्था सुरू करणाऱ्यांमध्ये शेख अहमद यासीनचाही समावेश होता. त्याने पॅलेस्टाईनला इस्रायलच्या वर्चस्वातून मोकळं करण्यासाठी ही संघटना उदयास आल्याचं म्हटलं होतं. यानंतर हमासने तिच्या भूमिकेत कालानुरूप बदल केले यातील एक होता तो म्हणजे इस्रायल सोबत समझौता करण्याचा.

hamas-israel-peace-talk

इस्रायलचा विरोध हा हमासच्या स्थापनेचा पाया आहे. हमासने सातत्याने इस्रायल आणि तिथल्या नागरिकांवर हल्ले केले. हल्ले करण्यासाठी त्यांनी स्वत: बनवलेली लघु टप्प्यात मारा करू शकतील अशी क्षेपणास्त्रे आणि इतर स्फोटके वापरली. गाझापट्टीमध्ये हमासने पॅलेस्टाईनच्या सैन्याशीही संघर्ष केला होता.

hamas-vs-palestine

2006 साली हमासने पॅलेस्टाईनच्या संसदेत बहुमत मिळवलं होतं. हमासने त्यानंतरही दहशतवादाचा पुरस्कार करणं, इस्रायलविरोधातील संघर्षाला तिलांजली देण्यास नकार दिला होता. यामुळे अमेरिकेस रशिया, युरोपिअन महासंघ यांनी पॅलेस्टाईनला आर्थिक मदत पुरवणं बंद केलं होतं.

hamas-parliment

एकीकडे अमेरिका, इंग्लंज, ऑस्ट्रेलिया, युरोपिअन महासंघ, जपानसारख्या देशांनी हमास ही दहशतवादी संघटना असल्याचे घोषित केले तर दुसरीकडे सिरीया, कतार,तुर्कस्तान सारख्या देशांनी हमासला पाठिंबा दिला.

hamas-terrorism

आपली प्रतिक्रिया द्या