IPL 2024 – बॉल बनवणारी कंपनी बदला! KKR च्या पराभवानंतर ‘या’ माजी खेळाडूचा संताप

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यामध्ये 16 एप्रिल 2024 रोजी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थानने कोलकाताचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना 223 धावांचे मोठे लक्ष्य दिले. मात्र, बटलरने (66 चेंडू 107 धावा) केलेल्या शतकी खेळीमुळे राजस्थानने 224 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले. हा पराभव कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्याने आता मोठी मागणी केली आहे.

IPL 2024 – ‘जॉस’ लढला आणि जिंकला! कोलकाताचा पराभव करत राजस्थान दोन विकेटने विजयी

आयपीएल 2024 च्या सतरावा हंगाम हा आतापर्यंत तरी ऐतिहासीक ठरला आहे. सनराझर्स हैदराबादने दोनवेळा आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध 283 धावा करत त्यांचाच रिकॉर्ड त्यांनी मोडीत काढला. खेळपट्टी सपाट असल्यामुळे आणि चेंडू फारसा वळत  नसल्यामुळे या हंगामात फलंदाज गोलंदाजांवर बरसताना दिसले आहेत. यावरून गौतम गंभीरने मोठी मागणी केली आहे. “जर एखादी कंपनी 50 षटके टिकणारा चेंडू तयार करू शकत नसेल, तर त्या कंपनीऐवजी दुसऱ्या कंपनीच्या चेंडूने खेळले पाहिजे. कंपनी बदलण्यात काहीही चुकीचे नाही. फक्त कुकाबुरा बॉल वापरण्याची सक्ती आहे का?,” असे म्हणत गंभीरने चेंडू बनवणारी कंपनी बदलण्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

IPL 2024 – गुजरातचे आज दिल्लीपुढे आव्हान