IPL 2024 – बॉलीवूड कलाकार अन् गायकांनी क्रिकेटशौकिनांना केले मंत्रमुग्ध

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 17 व्या हंगामातील उद्घाटन सोहळा देशभक्तीपर गीतांनी रंगला. बॉलीवूडचे कलाकार आणि गायकांनी उपस्थित क्रिकेटशौकिनांना आपल्या तालावर थिरकायला लावले.

अक्षय कुमारने आकाशातून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर उतरून आयपीएल उद्घाटन सोहळय़ाची सुरुवात केली. त्यानंतर अक्षय कुमारच्या साथीला टायगर श्रॉफ आला. या दोघांनी देशभक्तीपर गाण्यांवर आपली अदाकारी सादर केली. त्यानंतर जय जय शिव शंकर… आज मूड है भयंकर… देसी बॉयज… हरे राम राम… चुरा के दिल मेरा… बाला-बाला व सुनो गौर से दुनिया वालों… आदी बॉलीवूड गाण्यांवर आपल्या अदाकारींनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. त्यानंतर सोनू निगम यांनी वंदे मातरम गाणे गाऊन, तर ए. आर. रहमानने माँ तुझे सलाम आणि नीती मोहनने बरसो रे मेघा या गाण्यांवर उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात चांद्रयान मोहिमेचे ऑनिमेशनदेखील दाखवण्यात आलं. त्याचबरोबर गाण्यांच्या कार्यक्रमात देशभक्तीपर गाण्यांची संख्यादेखील जास्त होती. उद्घाटन सोहळा संपन्न होताच आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 17व्या हंगामाचा शंखनाद झाला.

IPL 2024 – चेन्नईचा विजयी धमाका सुरू, आरसीबीचा 6 विकेट राखून केला पराभव