IPL 2024 : …तर पंतवर एका सामन्याची बंदी; BCCI मोठा निर्णय घेणार, दिल्लीच्या डोक्याला ताप

ऋषभ पंत याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी आतापर्यंत सुमार राहिली आहे. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामना दिल्लीने 106 धावांच्या अंतराने गमावला. चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये दिल्लीला पराभूत व्हावे लागले आहे. या पराभवानंतर कर्णधार पंत आणि दिल्लीच्या संघाला आणखी एक धक्का बसला. बीसीसीआयने कर्णधार पंतवर कारवाई केली असून आता त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवारही आहे.

स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने ऋषभ पंत याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. यंदाच्या हंगामामध्ये स्लो ओव्हर रेटमुळे पंतवर कारवाई होण्याची ही दुसरी वेळ आहे. बीसीसीआयने त्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर दिल्लीच्या संघातील इतर खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे.

स्लो ओव्हर रेटच्या नियमानुसार, निर्धारित 90 मिनिटांमध्ये 20 षटके पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 20 षटके टाकण्यासाठी दिल्लीने तब्बल 2 तास घेतलेय. त्याआधी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या लढतीतही दिल्लीचा संघ निर्धारित वेळेपेक्षा 3 षटकं मागे होता. त्यामुळे शेवटच्या दोन षटकांमध्ये त्याला 4 ऐवजी 5 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आत ठेवावे लागले होते.

IPL 2024 : कोलकात्यापुढे दिल्ली नमली; 18 षटकारांनिशी 272 धावा चोपल्या, दिल्लीचा धावांनी दारुण पराभव

सीएसकेविरुद्धच्या सामन्यानंतर पंतला 12 लाखांचा दंड झाला होता. तर दुसऱ्यांदा ही चुकी झाल्याने त्याला 24 लाखांचा दंड झाला आहे. मात्र एकाच हंगामात पंतने तिसऱ्यांदा अशी चूक केली तर त्याला 30 लाख रुपयांच्या दंडासह एक सामन्याची बंदी अशी शिक्षा होईल. तसेच संघातील खेळाडूंनाही याचा भूर्दंड बसेल. दिल्लीच्या खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के रक्कम दंड होईल. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यात स्लो ओव्हर रेटकडे पंतला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.