‘दोन पक्ष फोडले तरी देखील…’, असली-नकलीवरून जयंत पाटलांचा अमित शहांना टोला

एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचे. महाराष्ट्रात दोन पक्ष फोडले तरीदेखील प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच नकली आणि असली हे नवीन प्रकरण तयार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण कोण नकली आणि कोण असली हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू द्या. महाराष्ट्राची जनता हुशार असून जे फुटून गेलेले आहेत त्यांच्या विरोधात यंदाचा निकाल असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

अमित शहा यांना योग्य त्या व्यासपीठावरून योग्य वेळी आम्ही उत्तर देऊ. शरद पवार यांनी महाराष्ट्राला काय दिले हे राज्यातील तरुणांना, महिलांना, सरकारी कर्मचाऱ्यांना व सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणूनच महाराष्ट्र त्यांना मानतो, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे हा सगळ्यांचा प्रयत्न होता. परंतु पवारांनी ती विचारधारा स्वीकारण्याला नकार दिला, असेही जयंत पाटील म्हणाले.

आता गांभीर्याने घेतले नाही, तर ही लोकसभा निवडणूक शेवटची ठरेल, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती

महागाई, बेरोजगारी यासारखे प्रश्न लोकांपुढे माडण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीने केला आहे. लोकांचा याला पाठिंबा मिळतोय, असेही जयंत पाटील म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)