कुडाळात शिवसेनेची लक्षवेधी रिक्षा रॅली, नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी!

कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बुधवारी लक्षवेधी रिक्षा रॅली काढून नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी सजविलेल्या रिक्षांवर पक्षाचे झेंडे लावून तसेच घोषणाबाजी करीत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेने रिक्षा रॅली काढून येथील भंगसाळ नदीत नारळ (श्रीफळ) अर्पण केले. जिल्हा रिक्षा चालक – मालक संघटना तसेच नागरीकांनी भंगसाळ नदी पात्रात श्रीफळ अर्पण केले. यावेळी भंगसाळ नदी किनारी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पोलिस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता.

कुडाळ येथे नारळी पौर्णिमे दिवशी दरवर्षी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित रिक्षा संघटनेमार्फत रिक्षा रॅली काढून, येथील भंगसाळ नदीत नारळ अर्पण करत नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेने बुधवारी सायंकाळी डिजेच्या तालावर रिक्षा रॅली काढून नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. प्रथमतः येथील श्री देव पाटेश्वर मंदीरातील पालखीने निघालेला मानाचा नारळ तहसीलदार अमोल पाठक व पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांच्या उपस्थितीत भंगसाळ नदीत अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेमार्फत सजविलेल्या मानाच्या रिक्षेवरील कलशातून नारळ (श्रीफळ) भंगसाळ नदी जवळ नेऊन नदीत अर्पण करण्यात आला. जवळपास दिडशे रिक्षा या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

आमदार वैभव नाईक, अमित सामंत रॅलीत सहभागी
येथील शिवसेना शाखेसमोर जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रिक्षा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांनी रॅलीत सहभाग घेतला. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत श्रीफळ भंगसाळ नदीत अर्पण करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर, संतोष शिरसाट, नगरसेविका सौ.श्रेया गवंडे, सौ.सई काळप, सौ.श्रुती वर्दम, सौ.ज्योती जळवी, माजी उपसभापती जयभारत पालव, सरपंच संघटना अध्यक्ष मिलिंद नाईक, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, सचिन काळप, पावशी उपसरपंच कांता तेली, गुरू गडकर, राजू गवंडे, सुशील चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, दिनेश वारंग, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, विभागप्रमुख शेखर गावडे, गंगाराम सडवेलकर, अनुप नाईक, सचिन गावडे, कृष्णा तेली, संतोष अडुरकर, विनोद शिरसाट, रिक्षा युनियनचे संजय मसुरकर, बाळा वेंगुर्लेकर, दाजी गावडे, नागेश जळवी, आंबडपाल उपसरपंच गोट्या चव्हाण, दिपक आंगणे, स्वप्नील शिंदे, बाळू पालव, बाबी गुरव, शामा परब आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते. दरम्यान पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.