Lok Sabha Election 2024 Voting Update – महाराष्ट्रात 3 वाजेपर्यंत 43.01 टक्के मतदान

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 8 जागांसह देशभरातील 88 जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहायला मिळत आहे. उन्हाचा कडाका वाढला असला तरी मोठ्या उत्साहात लोकं लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होताना दिसत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये बुलढाण्यात नरेंद्र खेडेकर, हिंगोलीत नागेश पाटील-आष्टीकर, यवतमाळ-वाशीममध्ये संजय देशमुख, परभणीत संजय जाधव हे शिवसेनेचे शिलेदार रिंगणात आहेत. तर नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण, अमरावतीत बळवंत वानखेडे, अकोल्यात डॉ. अभय पाटील तर वर्ध्यात राष्ट्रवादीचे अमर काळे लढत आहेत. वाचा लाईव्ह अपडेट…

हे वाचा – NOTA ला उमेदवार माना आणि बिनविरोध निवडणूक रद्द करा; SC मध्ये याचिका, ECI ला नोटीस

हे वाचा – लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा; मोदी सरकारने महाराष्ट्रातून गुजरातला पळवून नेलेले उद्योग परत आणणार

हे वाचा – मतदार ‘इंडिया’सोबत, महाराष्ट्रात 35हून अधिक जागा जिंकू; माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

  • महाराष्ट्रात 3 वाजेपर्यंत 43.01 टक्के मतदान

  • नांदेड जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 42.42 टक्के मतदान
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 3 वाजतापर्यंत 42.55 टक्के मतदान
  • नांदेड लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.93 टक्के मतदान
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 1 वाजतापर्यंत 31.47 टक्के मतदान
  • वर्धा मतदारसंघात 18.35 टक्के, अकोल्यात 17.37 टक्के, अमरावतीमध्ये 17.73 टक्के, बुलढाणा 17.92 टक्के, हिंगोलीमध्ये 18.19 टक्के, नांदेडमध्ये 20.85 टक्के, परभणीमध्ये 21.77 टक्के आणि यवतमाळ-वाशिममध्ये 18.01 टक्के मतदान
  • महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.33 टक्के, तर त्रिपुरात सर्वाधिक 36.42 टक्के मतदान

  • ‘राष्ट्रीय कर्तव्य’ म्हणत तीन दिवसांपूर्वी हार्ट सर्जरी झालेले 70 वर्षीय ज्ञानेश्वर मुंद्रे यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावातील गुरुदेव नगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला

  • नांदेड लोकसभा मतदार संघात 11 वाजेपर्यंत 19.68 टक्के मतदान
  • 90 वर्षांच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला 

  • रुग्णालयातून डिस्चार्ज घेत मनोज जरांगे पाटील मतदान करायला परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागडजवळील बोरी गंधारी येथील मतदान केंद्राकडे रवाना

  • माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • महाराष्ट्रामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7.45 टक्के मतदान
  • आसाममध्ये 9.71 टक्के, बिहारमध्ये 9.84 टक्के, छत्तीसगड 15.42 टक्के, जम्मू-कश्मीर 10.39 टक्के, कर्नाटक 9.21 टक्के, केरळ 11.98 टक्के, मध्य प्रदेश 13.82 टक्के, महाराष्ट्र 7.45 टक्के, मणिपूर 15.49 टक्के, राजस्थान 11.77 टक्के, त्रिपुरा 16.65 टक्के, उत्तर प्रदेश 11.67 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 15.68 टक्के मतदान

  • “आधी लगीन लोकशाहीचे…” म्हणत नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी अमरावती येथे मतदानाचा हक्क बजावला

  • अमरावतीत लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.34 टक्के मतदान
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 7.23 टक्के मतदान
  • काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी सहकुटुंब मोझरी येथे मूळगावी मतदानाचा हक्क बजावला

  • भोकरमध्ये 6.45 टक्के, नांदेड उत्तरमध्ये 7.97 टक्के, नांदेड दक्षिमध्ये 10.5 टक्के, नायगावमध्ये 9.17 टक्के, देगलूरमध्ये 6.9 टक्के, मुखेडमध्ये 5.2 टक्के मतदान
  • नांदेड लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.73 टक्के मतदान

  • सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा