हिंदुस्थानच्या निवडणुकीवर अमेरिकेचा वॉच

हिंदुस्थानातील आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीकडे केवळ देशाचेच नव्हे तर जगातील अनेक देशांच्या नजरा लागल्या आहेत. निवडणुकीची घोषणा होण्याआधीच अमेरिकेतील एका खासदाराने सोशल मीडिया कंपन्यांना एक पत्र पाठवले आहे. हिंदुस्थानात होत असलेल्या निवडणुकीसंबंधी कोणती तयारी केली आहे, असा सवाल या कंपन्यांना अमेरिकन खासदारांनी केला आहे. अमेरिकी निवडणुकीवर वॉच ठेवणाऱया सिनेटची इंटेलिजन्स आणि नियम समितीचे सदस्य खासदार मायकल बेनेट यांनी सोशल मीडिया कंपन्यांना पत्र पाठवले आहे. हे पत्र अल्फाबेट, मेटा, टिकटॉक आणि एक्स (ट्विटर) ला लिहिले आहे. या पत्रातून निवडणुकीसंबंधी मागितली आहे.

लोकशाही मजबूत करा

बेनेट यांनी एलन मस्क, मार्क झुकरबर्ग, शॉ जी च्यू, सुंदर पिचाई यांना पत्र पाठवले. लोकशाहीचा अर्थ लोकांकडून लोकांनी चालवलेले सरकार आहे. चुकीचा प्रसार लोकशाहीसाठी धोकादायक आहे. सोशल मीडियावरून लोकशाही मजबूत होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे या पत्रात म्हटले आहे.

या देशात निवडणुका

ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, युरोपीय संघ, फिनलँड, घाना, आइसलँड, नामिबिया, मेक्सिको, मोल्दोवा, मंगोलिया, पनामा, रोमानिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, यूके, अमेरिकेत निवडणुका होणार आहेत.