मनसेच्या पाठिंब्यानंतर भाजपला धक्का; उत्तर हिंदुस्थानी कार्यकर्ते शिवसेनेत

मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा राज ठाकरे यांनी मंगळवारी केल्यानंतर भाजपचे उत्तर हिंदुस्थानी कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. बुधवारी भाजपचे मीरा-भाईंदरमधील जिल्हा महामंत्री ब्रिजेश तिवारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते-खासदार राजन विचारे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते. उत्तर हिंदुस्थानींना अपमानित करणारी मनसे भाजपसोबत आल्याने आता यापुढे भाजपसोबत काम करू शकत नाही, अशा भावना यावेळी या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.