रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 24 डिसेंबर 2023 रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचे हाल होणार असून वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे.

मध्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकल अप-डाऊन धीम्या मार्गावरून धावणार आहेत. यावेळी काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही विलंबाने धावतील.

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाली 10.20 वाजता सुटेल. बदलापूरला जाणारी ही लोकल आहे. ब्लॉकनंतर 3.39 वाजता बदलापूरसाठी पहिली लोकल सुटेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल ते सीएसएमटी आणि ठाणे ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील. मात्र या काळात सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते नेरूळ/वाशी आणि बेलापूर/नेरूळ ते खारकोपर अशा लोकल फेऱ्या सुरू राहतील.

अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी सीएसएमटी स्थानकावरून पनवेलसाठी शेवटची लोकल 10.17 वाजता सुटेल आणि 11.36 ला पोहोचले. तर ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल 4.10 वाजता सुटेल आणि 5.30 वाजता पोहोचले.

दरम्यान, पश्चिम मार्गावर बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गाववर शनिवारी मध्यरात्री 12.35 ते रविवारी पहाटे 4.35 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.