उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

शिवसेना (उद्धक बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धक ठाकरे यांच्या काढदिकसानिमित्त शिवसेनेतर्फे मुंबईसह राज्यभरात किकिध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात किद्यार्थ्यांना कह्या, टॅब काटप, ज्येष्ठांचा सत्कार, रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शिवसेना शाखा क्र. 219, वाळकेश्वरच्या वतीने रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिफेसच्या सहकार्याने महिला पदाधिकारी व ज्येष्ठ शिवसैनिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे,  विभाग संघटिका युगंधरा साळेकर, उपविभाग संघटिका लतिका पास्टे, समन्वयक आरती लोटणकर, कोल्हापूर संपर्कप्रमुख जयश्री बाळ्ळीकर, शाखा समन्वयक अनिल गवाणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख राजेंद्र गायकवाड व शाखा संघटिका योगिता पेंढारकर यांनी केले.  

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावलीएकहात कर्तव्याचा या संस्थेतर्फे विक्रोळीच्या सूर्यानगर येथे राहणाऱया सुरेखा बोटांगळे यांना व्हीलचेअर देण्यात आली. आमदार सुनील राऊत, उपनेते दत्ता दळवी, विभाग संघटिका राजराजेश्वरी रेडकर, उपविभागप्रमुख धर्मनाथ पंत, ग्राहक संरक्षण कक्ष विधानसभा संघटक युवराज हांडे,  मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर, संचालक सदाशिव लाड, सचिव प्रमोद चौंडकर, खजिनदार संदीप चांदिवडे, दौलत बेल्हेकर, वसंत घडशी, संजय चव्हाण, श्रीकांत चिचपुरे, राजू पेडणेकर उपस्थित होते. 

विभाग क्रमांक-2 चे विभागप्रमुख अजित भंडारी, विभाग संघटिका मनाली चौकीदार, मालाड विधानसभा निरीक्षक संजय सुतार, माजी नगरसेविका संगीता सुतार यांच्या नियोजनाने मढ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 141 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. अनिल भोपी, किरण कोळी, विकास दसपुते, जयश्री म्हात्रे, अश्विनी सातारे, श्रद्धा मुळीक, संदेश घरत, नितीन कासकर, अंकित सुतार, आदित्य सुतार या कार्यक्रमाला उपस्थित होते.