निफ्टीने गाठला सर्वकालीन उच्चांक; पहिल्या दिवशीच 20 हजारांचा आकडा पार

मुंबई शेअर बाजाराच्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा म्हणजेच निफ्टीच्या निर्देशांकाने सोमवारी बाजार उघडताच 20,008 वर झेप घेत सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यानंतर बाजार बंद होताना तो 176 अंकांच्या वाढीसह 19,996 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 528 अंकांची वाढ होऊन तो 67,127 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील 30 कंपन्यांच्या शेअर्सपैकी तब्बल 28 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसली तर 2 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसली.  अदानी पोर्टस्, अदानी एंटरप्रायझेस, ऑक्सिस बँक, अपोलो हॉस्पिटल्स, पॉवर ग्रिड आणि मारुतीसह तब्बल 46 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झालेली दिसली तर एलटी, ओएनजीसी, बजाज फायनान्स आणि कोल इंडियाच्या केवळ चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसली.