युक्रेनला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी

लांबत चाललेले युद्ध संपवण्यासाठी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुतीन यांचे विशेष सल्लागार दिमित्री मेदवेदेव यांनी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. युक्रेनवर संघर्ष असाच सुरू राहिला आणि नाटोसोबत आमची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला अण्वस्त्रांचा वापर करावा लागेल. रशिया अण्वस्त्रांसह सर्व पर्याय वापरेल, अशी धमकी पुतीन यांनी दिली होती.