महिलांना प्यादं म्हणून वापरलं जाऊ नये! मणिपूर प्रकरणावर प्रियंका चोप्रा संतापली

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या घटनेने देश हादरला आहे. त्यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कडक कारवाई करण्याची देशभरातून मागणी केली जात आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीही या घटनेबाबत संताप व्यक्त करत आहे. यावर आता देसीगर्ल प्रियांका चोप्रानेही या घटनेचा निषेध करत आपला संताप व्यक्त केला आहे.

मणिपूरमध्ये 4 मे 2023 रोजी जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने देश सुन्न झाला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे. अशातच देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही या घटनेचा तीव्र निषेध करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांकाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘हा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, घृणास्पद अपराध झाल्यावर 77 दिवसांनी… कारवाई होण्यापूर्वी…..
तर्क किंवा कारण.. काही फरक पडत नाही, या सगळ्यापलिकडे कोणत्याही परिस्थितीत महिलांना कोणत्याही खेळातलं प्यादं म्हणून वापरलं जाऊ देता कामा नये…सगळी लाज शरम आणि राग आता एकत्रित करून, एकमुखाने एकच आवाज उमटायला हवा, तो म्हणजे ‘ताबडतोब न्याय’

प्रियांका चोप्राआधी अक्षय कुमार, रिचा चढ्ढा, आशुतोष राणा, रेणुका शहाणे, उर्मिला मातोंडकर, जया बच्चन, उर्फी जावेद, आलिया भट्ट, कियारा अडवाणी, संजय दत्त आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मणिपूरमधील महिलांसोबत होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला होता. दुसरीकडे, उर्फी जावेदने विमानतळावरील फलकावर मणिपूर हॅशटॅग लिहून निषेध केला. यासोबतच या सर्व सेलिब्रिटींनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.