राहुल गांधी पुन्हा वायनाडमधून लढणार, लोकसभेसाठी काँग्रेसचे 39 उमेदवार जाहीर

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. पहिल्या यादीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह 39 उमेदवार आहेत. राहुल गांधी हे दुसऱयांदा केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

पहिल्या यादीवर काँग्रेसमधील ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची छाप दिसून येत आहे. सर्वाधिक 16 उमेदवार हे केरळमधील असून यादीत चार महिला उमेदवारांचाही समावेश आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना केरळच्या अलापुझ्झा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी पेंद्रीय मंत्री शशी थरूर यांना काँग्रेसने तिरुवनंतपुरम मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. छत्तीसगडमधील सहा उमेदवारांचा पहिल्या यादीमध्ये समावेश आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना राजनंदगाव, माजी मंत्री ताम्रध्वज साहू यांना महासमुंद तर गेल्या निवडणुकीत मोदी लाटेतही विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का देणाऱया ज्योत्स्ना महंत यांना कोरबा मतदारसंघातून तिकीट दिले आहे.