प्रजासत्ताक दिनी समाजकंटकांचा जिल्हा परिषद शाळेत गोंधळ; शिक्षकांना मारहाण

fight
file photo

परळीत कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनी समाजकंटकांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. पहिली ते सातवी वर्गाच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात शिक्षकांना काही समाजकंटकांनी मारहाण केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

शहरातील आझाद नगर जुने रेल्वे स्टेशन परिसरात जिल्हा परिषद शाळा आहे. प्रजासत्ताक दिनी या शाळेत वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे आयोजन केले गेले होते. कार्यक्रम सुरू असतानाच एका समाजकंटकाने शाळेत येत शिक्षकांना शिवीगाळ करत मारहाण केली. कार्यक्रम सुरू असताना वातावरण खराब होऊ नये त्यामुळेत्या व्यक्तीला शाळेबाहेर काढण्यात आले. मात्र पुन्हा काही वेळातच सोबत तीन-चार जणांना सोबत घेऊन शाळेत येत धुडगूस घातला. सदरील घटनेची नोंद संभाजीनगर पोलीस ठाणे येथे करण्यात आली. मात्र यामध्ये आपसात मिटवून घेत असल्याची लेखी नोंद पोलीस डायरीला करण्यात आली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.