मॅक्सवेलचा आयपीएलमधून ब्रेक

आपल्या अपयशी खेळामुळे सर्वांना निराश करणाऱया रॉयल चॅलेंजर्स बंगळरूच्या ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला स्वतःला थोडी मानसिक आणि शारीरिक विश्रांतीची गरज आहे, अशी प्रामाणिक कबुली देत त्याने हा निर्णय घेतलाय. अतिशय सुमार कामगिरीमुळे बंगळुरूचा संघ आयपीएलच्या गुणतक्त्यात सध्या तळाला आहे. या संघाने सातपैकी सहा सामने गमावले आहेत. यात ग्लेन मॅक्सवेललाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने 6 सामने खेळले असून 5.33 च्या सरासरीने केवळ 32 धावा केल्या आहेत. शिवाय मॅक्सवेलला तीन वेळा भोपळाही पह्डता आलेला नाही. आयपीएलच्या 17 व्या हंगामातून ब्रेक घेण्यापूर्वी ग्लेन मॅक्सवेलने माझ्या जागी संघात दुसऱयाला संधी देण्याची आता वेळ आली असल्याचे सांगितले. हा निर्णय माझ्यासाठी सोपा होता. कारण मला स्वतःला थोडी मानसिक आणि शारीरिक विश्रांती देण्याची गरज आहे. याबाबत मी प्रशिक्षक आणि कर्णधाराशी बोललो होतो. जर संघाला माझी आणखी गरज भासली तर मी निश्चितच नव्या मानसिकतेने पुनरागमन करेन.