आंदोलनकर्ते 50 खोक्याच्या सरकारपुढे झुकणार नाही, संजय राऊत यांचा घणाघात

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत असून त्यांच्या आंदोलनामुळे मिंधे सरकारला घाम फुटायला लागला आहे. पाटील यांच्यावर आमिषे, दबाव येऊनही ते झुकत नाही याचे या राज्याला कौतुक आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनावरून मिंधे-भाजप सरकारवर कडाडून टीका केली. राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, सरकारचे प्रतिनिधी तिथे गेले होते, काय झालं ? आंदोलन संपलं का ? ते आंदोलन मागे घेणार नाही , कारण ते तुमच्या 50 खोक्यांनी विकले जाणारे नाहीयेत. ते गरीब लोकं असून ते न्याय हक्कासाठी लढत आहेत. ते तुमच्या 50 खोक्याच्या सरकारपुढे झुकणार नाही.

राऊत यांनी ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांच्या पार्टीला फरार ललित मोदी आणि ईडी,सीबीआय शोधत असलेल्या मोईन खान यांना आमंत्रणे होते. हे दोघेही या पार्टीला हजर होते. हरीश साळवे यांचे लग्न आणि त्यांनी दिलेली पार्टी हा त्यांचा खासगी विषय आहे मात्र हरीश साळवे हे वन नेशन वन इलेक्शनसाठीच्या समितीचे सदस्य आहेत, या समितीमध्ये विरोधी पक्षनेते असलेले मल्लिकार्जुन खर्गे देखील नाहीत मात्र साले या समितीमध्ये आहेत याकडे राऊत यांनी लक्ष्य वेधले. पंतप्रधान मोदी त्यांच्या मानगुटीला पकडून आणण्याचे बोलत आहे, भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही असं म्हणतात. केंद्राने नेमलेल्या समितीच्या एका सदस्यांसोबत हीच भगोडी मंडळी चिअर्स करत आहेत. नैतिकतेचा मुद्दा आला तर त्याबाबत भाजपच्या सगळे प्रवक्त्यांनी आणि अमित शहांनी बोलले पाहिजे असे राऊत यांनी म्हटले.

अजित पवारांच्या उपस्थितीतच फडणवीसांनी काढला ‘मावळ गोळीबाराचा मुद्दा’

जालन्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी सुरू असेल्या उपोषणावेळी करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात सर्व स्तरांतून टीका झाली. त्यानंतर सोमवारी एक संयु्क्त पत्रकारपरिषद घेत फडणवीसांनी शासनाच्या वतीनं माफी मागितली. मात्र त्याच वेळी त्यांनी मावळमधील शेतकरी आंदोलनात झालेल्या गोळीबाराचा उल्लेख केला. विशेष म्हणजे त्यावेळी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते. यावरून भाजपने याआधी वेळोवेळी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. तशा पोस्ट आजही भाजपच्या अधिकृत सोशलमीडिया पेजवर आहेत. मात्र अजित पवार हे आता फडवीसांसोबत सत्तेत असल्यानं त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख केला असला तरी या निमित्तानं त्यांनी अजित पवारांना शब्दांनी टोचण्याची संधी फडणवीसांनी सोडली नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.