आदित्य ठाकरे यांचा आज भांडुप, मुलुंडमध्ये शाखासंवाद

शिवसेना नेते-युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा झंझावाती शाखा संवाद दौरा सुरू आहे. आदित्य ठाकरे उद्या उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. सायंकाळी सात वाजता भांडुपमधील सह्याद्रीनगर शाखा क्र. 115 येथे तर रात्री 8 वाजता मुलुंड पूर्व शाखा क्र. 106 येथे भेट देऊन ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. संजय दिना पाटील यांना शिवसेनेने या मतदारसंघातून निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे.